शैक्षणिक संस्थांनी शुल्क वाढ केल्यास होणार कारवाई, शिक्षणमंत्र्यांचा सज्जड दम... 

HNG20A00294
HNG20A00294
Updated on: 

हिंगोली : राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र शैक्षणिक संस्था ह्या ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली फिवाढ करीत असल्याचा पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संस्थांनी फीमध्ये वाढ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले. 

पालकमंत्री वर्षा गायकवाड ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हिंगोली दौऱ्यावर आल्या असता त्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठकीसाठी आल्या होत्या. या वेळी पत्रकारांनी शैक्षणिक संस्था ह्या सक्तीने फीमध्ये वाढ झाल्याचे सांगून पालकांकडून पैसे उकळत असल्याचा मुद्दा छेडला असता पालकमंत्री म्हणाल्या, सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांची फी भरण्यास परिस्थिती नाही, असे सांगून काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात झाली आहे, तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालकांची फी भरण्यास मनस्थिती राहिली नसल्याचे सांगून संस्थांना देखील आम्ही सांगितले फिसमध्ये कोणत्याही प्रकरची वाढ करू नये, अश्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक संस्थांनी टप्या टप्यानुसार फी घ्यावी
शैक्षणिक संस्थांनी टप्या टप्यानुसार फी घ्यावी, सहा महिन्याला किंवा तीन महिन्याला फी घेऊन पालकांना सपोर्ट करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थाचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी एकमेकांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडविण्याचे सांगितले. याबाबत राज्य शासनाने (ता.आठ) मे ला परिपत्रक काढले होते. परंतु हे प्रकरण मा. उच्य न्यायालयात गेल्याने त्यावर स्टे दिला गेला. आता सुप्रीम कोर्टात केस लढत असल्याचे शेवटी गायकवाड यांनी सांगितले. 

शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत मौन 
राज्यासह जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून केवळ विद्यार्थ्यांविना शिक्षक येऊन प्रवेश प्रक्रियेची कामे करीत आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु करणार असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता यावर अधिक न बोलता त्या थेट अधिकाऱ्यांच्या बैठकीला निघून गेल्या.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The striped 'Ramling Tiger', captured on a Forest Department trekking CCTV camera.
paradh police station
Farmers' organizations and sugarcane growers demanding an increase in sugarcane prices during a meeting held with the District Collector, the MLA, and representatives of sugar mills.
Director Sandeep Shingare’s hunger strike enters second consecutive day